दर महिन्याला नियमितपणे SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांसमोर अचानक आर्थिक अडचण आली तर एक प्रश्न नक्की पडतो—SIP बंद करावी की काही काळासाठी Pause करावी? (mutual funds)
उत्पन्न कमी झाले, अचानक मोठा खर्च आला किंवा काही महिन्यांसाठी पैशांची गरज निर्माण झाली, तर SIP चा हप्ता सुरू ठेवणे कठीण होऊ शकते. अशा वेळी घाईघाईने Mutual Fund मधील जुनी गुंतवणूक विकण्याआधी SIP बंद करणे आणि SIP Pause करणे यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक अडचण आली तर SIP लगेच बंद करावी का ?
जर काही महिन्यांसाठीच पैशाची अडचण असेल आणि त्यानंतर उत्पन्न पूर्वत होण्याची शक्यता असेल तर उपलब्ध असल्यास SIP Pause हा पर्याय बद्दल आपण विचार करू शकतो.
पण जर आर्थिक अडचण दीर्घ का राहणार असेल तर SIP कायमची बंद करण्याचा पर्याय बद्दल आपण विचार करू शकतो.
SIP बंद करणे म्हणजे तुमची म्युच्युअल फंड गुंतवणूक विकणे नाही.
SIP बंद केल्यानंतर आधी खरेदी केलेल्या म्युच्युअल फंड्स युनिट्स तुमच्या नावावर राहतात फक्त भविष्यातील नवीन SIP इंस्टॉलमेंट थांबतात.
SIP Pause म्हणजे काय ?
SIP Pause म्हणजे काही काळासाठी नवीन एसआयपी इन्स्टॉलमेंट थांबवणे आणि त्यानंतर एसआयपी पुन्हा सुरू होणे.
आपल्या माहितीसाठी काही Mutual Fund Schemes मध्ये SIP Pause सुविधा उपलब्ध असते मात्र किती महिन्यांसाठी SIP Pause करता येईल.
किती वेळा पॉज करता येईल आणि कोणत्या माध्यमातून एसआयपी सुरू करता येईल यावर वेगवेगळे नियम असू शकतात.
काही AMC च्या कागदपत्रांमध्ये 3 किंवा 6 महिन्यासाठी SIP Pause करण्याची सुविधा दिलेली आहे त्यामुळे आपल्याला आपण निवडलेल्या Mutual Fund Scheme चे नियम तपासणी आवश्यक्य आहे.
SIP बंद केल्यावर Mutual Fund मधील पैसे मिळतात का ?
नाही
हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
तुम्ही SIP Cancel केली म्हणजे तुमची Mutual Fund Investment आपोआप विकली जात नाही
उदाहरणार्थ
तुम्ही तीन वर्षे दर महिन्याला रुपये 5000 SIP केली आणि आता एसआयपी बंद केली तर आधी खरेदी केलेले युनिट्स तुमच्या Mutual Fund Account मध्येच राहतात.
परंतु पैसे बँक खात्यात आणण्यासाठी तुम्हाला Redemption करावे लागते.
Mutual Fund मधून पैसे कसे कमवता येतात यासाठी
