सध्याच्या पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहून इलेक्ट्रिक गाड्यांचे घेणे खूप फायद्याचा पर्याय आहे.
गेले काही वर्षापासून इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट जगभरासह आपल्या भारता मध्ये देखील वाढलेले आहे.
प्रदूषणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोक पेट्रोल ऐवजी इलेक्ट्रिक कडे वळतायत.
Electric गाड्यांचे फायदे
- इंधनावरील गाड्या पंपावर वेळ लावत नाहीत परंतु इलेक्ट्रिक गाडीला चार्ज होण्यासाठी टाईम लागतो.
- इंधन गाड्यांसारखा याला इंजिन नसतं आणि स्पेअर पार्ट्स ही कमी असतात त्यामुळे मेंटेनन्स खर्च फार कमी असतो.
- तुमचा रोजचा प्रवास जवळच्या जवळ प्रवास असेल उदाहरण 100 Km (किलोमीटरच्या) आत तर इलेक्ट्रिक गाडी खूप परवडते.
- इलेक्ट्रिक गाड्यांना पिकप चांगला असतो गाडी आवाज करत नाही आणि गिअर बदलण्याचा त्रास ही नसतो.
- इलेक्ट्रिक गाडी वापरून तुम्ही दर महिन्याला चांगले पैसे वाचवु शकतात.
- इलेक्ट्रिक गाडी घेण्यासाठी शासन अनुदान देखील आपल्याला देत.
- इलेक्ट्रिक गाड्यांना स्पेअर पार्ट कमी असतात त्यामुळे त्यांना बदलण्याचा ताण कमी होतो.
- Ev इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये मोठ्या इंजिनची गरज नसते मोटर सॉफ्टवेअर ने ट्यून करून जास्त पावर आपल्याला मिळवता येतो यामध्ये झिरो आर पी एम पासून पूर्ण टॉर्क मिळतो ज्यामुळे आपल्याला पिकप उत्तम मिळतो.

