महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना

महिलांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती. या योजनामुळे महिलांना शिक्षण,आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक मदतीसाठी मोठा फायदा होणार आहे.
ही माहिती सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

1) बेटी बचाव बेटी पढाव योजना

उद्देश : मुलींचे संरक्षण करणे त्यांना शिक्षणाचे संधी देणे आणि समाजात मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे.

अर्ज कसा करावा : थेट आर्थिक लाभासाठी अर्ज नसतो. महिलांसाठी जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा.

आवश्यक कागदपत्रे :

  1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  2. आधार कार्ड
  3. रहिवासी दाखला

2) सुकन्या समृद्धी योजना

उद्देश : मुलींच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी बचत खात्याद्वारे मदत.

अर्ज कसा करावा : मुलगी दहा वर्षापेक्षा लहान असताना जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन खाते उघडू शकता.

आवश्यक कागदपत्रे :

  1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  2. पालकाच्या आधार कार्ड
  3. पत्ता पुरावा म्हणजे रहिवासी
  4. फोटो.

3) प्रधानमंत्री उज्वला योजना

उद्देश : पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देऊन धुरापासून मुक्तता देणे.

अर्ज कसा करावा : जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टल वर अर्ज करता येतो.

आवश्यक के कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. राशन कार्ड
  3. बँक पासबुक
  4. मोबाईल नंबर
WhatsApp Image 2026 09 23 At 7.14.38 AM 1

4) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

उद्देश : गर्भवती आणि स्तनदा मातांना आरोग्यासाठी तसेच आहारासाठी आर्थिक मदत देणे.

अर्ज कसा करावा : जवळच्या अंगणवाडी केंद्रात अशा सेविका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

आवश्यक के कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. मोबाईल नंबर
  4. एम सी पी (MCP) कार्ड

5) महिला शक्ती केंद्र योजना

उद्देश : ग्रामीण भागातील महिलांना सरकारी योजनांची माहिती कौशल्य प्रशिक्षण आणि सक्षमीकरणासाठी मदत करणे.

अर्ज कसा करावा : जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.

6) लेक लाडकी योजना

उद्देश : मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत देऊन मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

अर्ज कसा करावा : अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास विभाग किंवा संबंधित सरकारी कार्यालयात अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे

  1. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  2. मुलीचे व पालकाचे आधार कार्ड
  3. उत्पन्न प्रमाणपत्र
  4. बँक पासबुक
  5. रहिवासी दाखला

ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या घरातील प्रत्येक महिलेपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन सरकारी योजना ऑनलाइन माहितीसाठी आपल्या वेबसाईटला visit करत राहा.

Leave a Comment